Home ब्रेकिंग न्यूज Political News : संसदेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जाणून घ्या कारण

Political News : संसदेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जाणून घ्या कारण

0
Political News : संसदेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जाणून घ्या कारण
Ajit Doval

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुण्याचा दौरा करणार आहेत. दोन उच्चपदस्थांचा दौरा असल्यामुळे पुण्यात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असतील.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. १ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ पुण्यातील महाराष्ट्र मंडळ मैदान, गुलटेकडी येथे होणार आहे.

https://prahaar.in/2026/07/20/fifa-world-cup-2026-argentina-head-coach-emotional-after-defeat-against-spain-choked-up-during-the-press-conference-unable-to-hold-back-tears/

८१ वर्षीय अजित डोवाल यांनी मिझोराम, सिक्कीम, पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागांत काम केले आहे. त्यांनी इस्लामाबाद आणि लंडन येथील भारतीय दूतावासातही सेवा बजावली आहे. ते भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिले असून आजही या पदावर कार्यरत आहेत. डोकलाम वादानंतर चीनसोबत झालेल्या महत्त्वाच्या चर्चेतही त्यांनी भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

https://prahaar.in/2026/07/20/preservation-of-the-marathi-language-and-dialects-to-gain-momentum/

लोकमान्य टिळक पुरस्कार १९८३ पासून दिला जात आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जातो. देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी , मनमोहन सिंग , सोनिया गांधी प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here