शिर्डी साई मंदिराबाहेर महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ
मुंबई: साईबाबांच्या शिर्डी मंदिर (Shirdi Temple) परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. भर गर्दीत झालेल्या या प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Women Attack)
या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या मंदिर परिसरात काकडी आणि कैरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी महिलेला तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Ahmednagar News)
https://prahaar.in/2026/07/20/horrific-best-bus-accident-in-mankhurd-one-elderly-person-killed-several-injured/
प्राथमिक माहितीनुसार, मंदिर परिसरात स्टिकर विक्री करणाऱ्या 4 ते 5 महिलांनी जयश्री यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Shirdi Police)
दरम्यान, जखमी महिलेच्या पतीने या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जयश्री अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात व्यवसाय करत असून त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. अचानक काही महिलांनी चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिर परिसरात अशा प्रकारे धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले. (Crime News)
https://prahaar.in/2026/07/19/malad-sewage-treatment-plant-malad-sewage-treatment-plant-receives-necessary-clearances-including-those-related-to-mangroves-municipal-commissioner-ashwini-bhide-reviews-the-project/
या घटनेनंतर साई मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि लहान व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून हल्ल्याचे कारण आणि आरोपींची भूमिका याबाबत सखोल तपास सुरू आहे.