20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा
मुंबई : उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या 20 लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी एका महिलेने आपल्या कथित प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल पंवार यांना पत्नी दामिनी रुग्णालयात घेऊन गेली होती. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला दामिनीने पतीचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे सांगितले. घटनास्थळी सापही आढळल्याने सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. (Murder News)
https://prahaar.in/2026/07/19/shocking-revelation-in-the-sunil-more-suicide-case-after-doing-something-horrific-with-both-his-children/
मात्र, तपासादरम्यान पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यानंतर दामिनीच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ती एका व्यक्तीशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले. तपासात तो तुषार नावाचा शाळेचा चालक असल्याचे निष्पन्न झाले. दोघांचे मोबाईल तपासल्यानंतर सापाशी संबंधित काही छायाचित्रे आणि इतर माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. (Husband Murder Case)
https://prahaar.in/2026/07/18/governor-jishnu-dev-varma-universities-need-to-integrate-skills-with-education-governor-jishnu-dev-varma/
प्राथमिक तपासानुसार, अतुल आणि दामिनी यांनी 2019 मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघे मिळून शाळा चालवत होते. याच काळात दामिनी आणि तुषार यांच्यात जवळीक वाढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच अतुल यांच्या नावावर 20 लाख रुपयांचा जीवन विमा असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. (Snake Bite Case)
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अतुल यांचा अपघात घडवून आणण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, त्यातून ते बचावले. त्यानंतर दुसरा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून मृत्यूचे नेमके कारण, हत्येचा कथित कट आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. (Murder)
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपांचा तपास सुरू असून न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित आरोपींना कायद्याने दोषी मानले जाऊ शकत नाही.