Home ब्रेकिंग न्यूज Amit Shah : प्रत्येक विद्यार्थ्याने मातृभाषेसह आणखी एक भारतीय भाषा शिकावी : अमित शहा

Amit Shah : प्रत्येक विद्यार्थ्याने मातृभाषेसह आणखी एक भारतीय भाषा शिकावी : अमित शहा

0
Amit Shah : प्रत्येक विद्यार्थ्याने मातृभाषेसह आणखी एक भारतीय भाषा शिकावी : अमित शहा
amit shah

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात देशातील पहिले भाषा संग्रहालय ‘शब्दलोक’ (म्युझियम ऑफ वर्ड्स) याचे उद्घाटन केले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रंथालयाने विकसित केलेले हे संग्रहालय भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणार आहे.(Amit Shah)

https://prahaar.in/2026/07/19/8-killed-12-injured-in-landslide-in-nagaland-rescue-operations-underway/

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, भाषा ही कोणत्याही देशाच्या वारशाची जपणूक करणारी आणि त्या देशाची संस्कृती समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मातृभाषेबरोबरच किमान आणखी एक भारतीय भाषा शिकावी, त्यामुळे देशाच्या विविध संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, असे त्यांनी सांगितले.(Political News)

https://prahaar.in/2026/07/19/is-ai-reading-your-private-emails-secure-your-gmail-account-with-these-simple-steps/

ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, देशाचे भविष्य केवळ महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून नसून, किती नागरिक ग्रंथालयांचा उपयोग करतात यावरही ते ठरते. बंगालच्या बौद्धिक परंपरेचा गौरव करताना त्यांनी साहित्य, विज्ञान, क्रांती आणि शिक्षण क्षेत्रात राज्याने दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच बंगाल पुन्हा एकदा देशाला दिशा देणारे राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/07/19/mobile-banking-users-beware-change-these-5-settings-immediately-or-your-bank-account-could-be-emptied/

‘शब्दलोक’ संग्रहालयात नऊ दालने असून, भारतातील २२ अधिकृत भाषांचा इतिहास, लिपी, साहित्य, मौखिक परंपरा, प्राचीन हस्तलिखिते, मुद्रित साहित्य आणि आधुनिक डिजिटल लेखनाचा प्रवास आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला आहे. डिजिटल डिस्प्ले, होलोग्राम आणि मोशन सेन्सर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे संग्रहालय अभ्यागतांना एक वेगळा सांस्कृतिक अनुभव देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here