Home देश Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

0
Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच LoC वर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी बाजूकडून झालेल्या विनाकारण गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय लष्कराने वेळीच प्रत्युत्तर देत हा डाव पूर्णपणे उधळून लावला. (Infiltration Bid Foiled In J&K)

दोन तास जोरदार गोळीबार :

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९.५० वाजता पाकिस्तानी बाजूकडून कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू करण्यात आला. सीमारेषेवर तैनात भारतीय जवानांना संशयास्पद हालचाली दिसताच त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंमध्ये जवळपास दोन तास चकमक सुरू होती. भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Infiltration Bid Foiled In J&K)

https://prahaar.in/2026/07/18/vikram-1-launch-pm-modi-congratulates-skyroot-founders/

शोधमोहीम सुरू, सुरक्षा वाढवली :

घुसखोर भारतीय हद्दीत शिरले आहेत का, याची खात्री करण्यासाठी शनिवारी सकाळपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, प्रत्येक हालचालीवर लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे. (Infiltration Bid Foiled In J&K)

‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची पहिली मोठी घटना :

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नियंत्रण रेषेवरील ही पहिली मोठी शस्त्रसंधी उल्लंघनाची घटना मानली जात आहे. प्राथमिक तपासात पाकिस्तानी गोळीबाराचा उद्देश दहशतवाद्यांना भारतीय सीमेत प्रवेश करण्यासाठी संरक्षण देणे हा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भारतीय लष्कराच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला. (Infiltration Bid Foiled In J&K)

https://prahaar.in/2026/07/18/shashi-tharoor-shashi-tharoor-stuck-in-a-lift-rescued-by-the-fire-brigade-after-15-minutes/

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त :

गेल्या वर्षी ७ ते १० मे दरम्यान पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सशस्त्र दलाने नियंत्रण रेषा न ओलांडता अवघ्या २२ मिनिटांत २६ अचूक क्षेपणास्त्रांच्या मदतीने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके मुख्यालय आणि जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूर तळ उद्ध्वस्त करण्यात आला होता. (Infiltration Bid Foiled In J&K)

या कारवाईनंतर पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुंछ आणि राजौरी परिसरातील नागरी भागांवर गोळीबार केला होता. आता पुन्हा एकदा LoC वरील तणाव वाढल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. (Infiltration Bid Foiled In J&K)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here