श्रीलंका : श्रीलंकेत आज (१८ जुलै) पासून लंका प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यापूर्वीच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारताला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकूण देणाऱ्या खेळाडूला श्रीलंकेत अटक झाली आहे. जाफना किंग्स संघाचा सह संघमालक असलेला मनजोत कालरा याला श्रीलंका पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या वर खेळाडूला लाज देण्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावरुन श्रीलंकेच्या क्रीडा भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्याला तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे. (Sri Lanka )
https://prahaar.in/2026/07/18/fifa-worldcup-2026-authentic-america-through-the-eyes-of-foreign-tourists-an-experience-beyond-the-image-portrayed-by-the-media/
२०१८ ला अंडर-१९ विश्व विजेता
भारतीय संघाने अंडर-१९ (२०१८) चे विजेतेपद पटकावले होते. संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवूनम जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यात मनजोत कालराने शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीमुळे तो प्रकाशझोतात आला होता. (Indian Cricketer)
https://prahaar.in/2026/07/18/dattatray-bharne-officials-will-visit-the-fields-if-complaints-regarding-spurious-seeds-fertilizers-and-pesticides-are-received/
नेमकं प्रकरण काय ?
दरम्यान २०२६ च्या सुरुवातीलाच त्याने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत एक संघ खरेदी करण्यासाठी गुंतवणीक केली आहे. तो जाफना किंग्स संघाचा सह संघमालक झाला आहे. श्रीलंकेच्या पोलिसांनी त्याच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी एका खेळाडूला पैसे देऊन मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीसांच्या तपासात अडळून आले आहे की, मनजोत कालराने स्पर्धा सुरु होण्याच्या १० दिवसांआधीच खेळाडूला संपर्क केला होता. संबधित खेळाडूने ही बाब अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तपास करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी मनजोत कालराला अटक केली आहे. (Match Fixing)
https://prahaar.in/2026/07/18/nashik-crime-news-the-young-man-who-killed-the-young-woman-also-ended-his-life/
पुढे पोलीसांनी सांगीतले की, त्याच्या विरोधात ही तक्रार श्रीलंकेचे क्रिकेटपटू अविष्का फर्नांडो, भानुका राजरक्षे आणि दुनिथ वेल्लालागे यांनी केली होती. हे तिघेही जाफना किंग्स संघातील खेळाडू आहेच. या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्टला स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लंका प्रीमियर लीग ही मॅच फिक्सिंग, लाचखोरी आणि भ्रष्टाचाराशी संबधित आरोपांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मॅच फिक्सिंगच्या आरोपात एका फ्रँचायजीच्या मालकाला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुणवण्यात आली होती. यासह न्यायालयाने २४ दशलक्ष श्रीलंकन रुपयांचा दंड ठोठावला होता.