Ahilyanagar (राहुरी) : अहिल्यानगर जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सक्रीय झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. या पार्श्वभुमीवर त्यांचा उद्या रविवारी राहुरीत आ. प्राजक्त तनपुरे यांच्या वाड्यावर जावून भेटीचा कार्यक्रम या निवडणुकीतील मोठा ट्विस्ट असून, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांची एंट्री खूप काही सांगून जाणारीच म्हणावी लागेल. राज्याच्या विधान परिषदेचे सभापती तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राम शिंदे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कमालीचे सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
https://prahaar.in/2026/07/18/massive-explosion-at-a-firecracker-factory-in-ahmedabad/
नवीन राजकीय समीकरण ?
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सभापती राम शिंदे यांनी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केल्याची कुणकुण दिसून येत आहे. राहुरीचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील सक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी लोकसभा आणि विधानसभा सदस्य प्रसाद तनपुरे यांच्या राहुरीतील राजकीय दृष्ट्या निर्णयक्षम असलेल्या शहरातील तनपुरे वाड्यावर सभापती राम शिंदे रविवारी भेट देणार आहेत. या महत्वाच्या भेटीत कोणते राजकीय समीकरण जुळविणार आहेत, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सहकारातील राजकारणात बाबुराव दादा तनपुरे यांच्यानंतर माजी खा. प्रसाद तनपुरे नि आता आ. प्राजक्त तनपुरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्याला कारणेही तसेच आहेत. तालुक्यात सहकाराचे जाळे निर्माण करुन त्यातील पारदर्शक कारभारातून कार्यकर्ता घडविण्याची जणू फॅक्टरीच गतकाळात होत होती. कालांतराने या सहकाराला दृष्ट लागून वाताहात झाली. ते वेगळे मात्र आजही तनपुरेंचा शब्द पाळणारा मोठा वर्ग तालुक्यात कार्यरत आहे.
https://prahaar.in/2026/07/18/devendra-fadnavis-major-decision-by-the-bjp-for-chief-minister-fadnavis-birthday-no-to-hoardings-banners-and-advertisements-appeal-made-to-donate-to-the-chief-ministers-relief-fund/
शिंदे यांची इनकमिंग वेगळ्या नितीचा भाग ?
याच पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजुला ठेवून सहकाराच्या राजकारणात समविचारी मंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. सहकारात फक्त विखे हे समीकरण झाले असताना, राम शिंदे यांची ही इनकमिंग वेगळ्या नितीचा भाग आहे का? आणि त्यातून विखेंच्या सहकाराच्या राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न होणार का? अशा प्रश्नांना राजकीय विश्लेषकांमधून तोंड फुटले आहे का अशा अनेकविध सवालांनी जन्म घेतल्याचे चित्र आहे.
एकूण यामुळे राजकिय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरे यांना गळाला लावत भाजप प्रवेश घडवून आणला नि बिनविरोध आमदारकीची माळ त्यांचा गळ्यात घातली. यामागे आगामी काळातील निर्णायक राजकारणाचा वास होताच, प्रामुख्याने होवू घातलेल्या जिल्हा बँकेचे गणित महत्वाचे होतेच. तर पुढील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या इलेक्शनच्या रणनीतीची पूर्वतयारी त्यामागे दडलेली होती. दरम्यान रविवारी सभापती राम शिंदे हे तनपुरे यांच्या वाड्यावर भेट देऊन तनपुरे यांना कोणते साकडे घालणार ? नि कोणती राजकीय समीकरणे जुळवणार? याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.