नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ
नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
https://prahaar.in/2026/07/17/ashram-school-headmaster-female-superintendent-and-class-teacher-suspended/
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने नदीपात्रातून कार बाहेर काढली. कारमध्ये शिक्षक आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळले. (Nanded Suicide)
मृत शिक्षकांची ओळख सुनील मोरे अशी झाली असून ते भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते. त्यांच्या मुलीचे नाव सारा, तर मुलाचे नाव सुमित होते. (ZP Teacher)
https://prahaar.in/2026/07/17/ahilyanagar-50-of-sir-work-completed-in-karjat-jamkhed/
अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संपवले आयुष्य
घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर हदगावचे गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या जाचाला कंटाळल्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. या स्टेटसनंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांकडून त्या दाव्याचीही पडताळणी केली जात आहे. (Police Investigation)
या प्रकरणात आत्महत्येमागील नेमके कारण, तसेच स्टेटसमध्ये केलेल्या आरोपांची सत्यता याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शिक्षण क्षेत्रातूनही दुःख व्यक्त केले जात आहे.