Home महाराष्ट्र ठाणे Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

0
Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन
Kalyan News

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन (Rejuvenation), सुशोभीकरण (Beautification) आणि सर्वांगीण विकासासाठी (Development) १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन (Memorandum) सादर केले. यावेळी त्यांनी भटाळे तलावाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय (Environmental) महत्त्व अधोरेखित करत त्याच्या जतन आणि संवर्धनाची आवश्यकता मांडली.

https://prahaar.in/2026/07/17/dcm-sunetra-pawar-handover-of-mementos-belonging-to-the-late-deputy-chief-minister-ajitdada-pawar-to-deputy-chief-minister-sunetra-pawar/

निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला भटाळे तलाव हा कल्याणच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या तलावाचे मूळ स्वरूप कालांतराने मोठ्या प्रमाणावर झालेल्या भरावामुळे आणि अतिक्रमणामुळे नष्ट होत चालले असून, आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच तलाव परिसरात बेकायदा बांधकामे वाढत असून जनावरांचे मलमूत्र आणि सांडपाणी (Sewage) तलावात सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण (Pollution) वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भटाळे तलावासाठी सर्वंकष विकास आराखडा (Master Plan) तयार करून पुनरुज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणीही नरेंद्र पवार यांनी केली. यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावाच्या विकासाची कामे तातडीने सुरू करावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here