ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी समजपत्र बजावले आहे. या घडामोडीमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Firoz Baba Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडीचे ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ, कोलगावचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, अमित नाईक, बाळा पेडणेकर आणि संजय परब या पाच जणांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 179 अंतर्गत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कलमानुसार तपासाच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींना लेखी नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले जाते. (Girija Raut)
https://prahaar.in/2026/07/17/massive-chemical-tanker-explosion-in-chembur-one-dead-three-injured/
गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध प्रकार करण्यात आल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. (Vinayak raut)
https://prahaar.in/2026/07/17/replica-of-siddhivinayak-temple-to-be-built-in-manipur/
या प्रकरणावरून यापूर्वीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब आणि ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आता पोलिसांनी समजपत्र बजावल्यानंतर या प्रकरणाला आणखी राजकीय रंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Thane Police)
दरम्यान, गिरीजा राऊत (Girija Raut case) यांनी तक्रारीत असा आरोप केला आहे की, संततीप्राप्तीसाठी सासरच्या मंडळींनी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून त्यांचा अमानुष छळ केला. वारंवार गोमूत्र पिण्यास भाग पाडण्यात आले आणि विविध अघोरी प्रकार करण्यासही दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची पोलिसांकडून तपासादरम्यान पडताळणी केली जात आहे. (Uddhav Thackeray)