Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : रामाच्या नावाने राजकारण बंद करा; संघभूमीवर जाऊन नाक घासा!

Nitesh Rane : रामाच्या नावाने राजकारण बंद करा; संघभूमीवर जाऊन नाक घासा!

0
Nitesh Rane : रामाच्या नावाने राजकारण बंद करा; संघभूमीवर जाऊन नाक घासा!

– संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मंत्री नितेश राणेंकडून समाचार

मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis)  यांना लिहिलेल्या पत्राचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला आहे. “रामाच्या नावाने राजकारण करणे आधी बंद करा आणि नागपुरात चाललाच आहात, तर संघभूमीवर नाक घासून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा,” अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

https://prahaar.in/2026/07/16/world-class-cancer-treatment-facilities-in-the-state-through-mahacare-high-energy-medical-cyclotron-project-approved-for-nagpur/

राणे म्हणाले, “आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला. प्रभू श्रीरामांच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला. जे प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागला?” असा खोचक सवाल राणे यांनी केला. रामरक्षा पाठ असणे तर दूरच, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पाने आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले देवेंद्रजींना सल्ले द्यायला… लाज वाटायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात कवडीचा सहभाग तुमचा नव्हता, ना उद्धव ठाकरे यांचा सहभाग होता. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खाऊन तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते देवेंद्रजी आहेत,” असे राणे यांनी नमूद केले. ( Shiv Sena UBT)

https://prahaar.in/2026/07/16/devendra-fadnavis-schools-to-now-teach-lessons-on-the-adverse-effects-of-drugs/

डर्टी संजय राऊत

“रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून आता पुळका दाखवू नका. किमान रामाच्या नावाने राजकारण (Political) करू नका. नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा… डर्टी संजय राऊत”, असा सल्लाही मंत्री नितेश राणे यांनी दिला. (Sanjay Raut)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here