मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार सातही तलावांमध्ये एकूण ५,३३,५२३ दशलक्ष लिटर (एमएल) पाणीसाठा जमा झाला असून, तो एकूण क्षमतेच्या ४८.६६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. (Mumbai Water Stock)
महापालिकेच्या अहवालानुसार, भातसा तलावात सर्वाधिक १,४२,७२० मिमी पावसाची नोंद झाली असून, मोडक सागरात १,३३६ मी, तानसा तलावात १,४२५ मिमी, मध्य वैतरणा येथे १,०८१ मिमी, वरच्या वैतरणा येथे ९१० मिमी, विहार येथे ७८१ मिमी आणि तुळशी येथे १,१४० मिमी पाऊस झाला आहे.
https://prahaar.in/2026/07/16/maharashtra-rain-update-a-strong-comeback-of-the-rains-yellow-alert-for-pune-and-other-districts-meteorological-department-issues-warning/
दरम्यान, विहार तलावाने ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली, तर तुळशी तलाव ७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी भरून वाहू लागला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य वैतरणा जलाशयातून ६ जुलै रोजी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी पाणी सोडणे बंद करण्यात आले, तर वरच्या वैतरणा तलावातून ६ जुलै रोजी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी विसर्ग थांबवण्यात आला. (Mumbai Water Stock)
https://prahaar.in/2026/07/15/maharashtra-weather-alert-weather-set-to-change-again-in-the-state-yellow-alert-for-rain-in-mumbai-thane-and-these-districts/