मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) यांनी अखेर त्यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट (Divorce) घेतल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आदिनाथ आणि उर्मिला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र, यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता दोघांनी संयुक्त निवेदन (Joint Statement) प्रसिद्ध करत आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
https://prahaar.in/2026/07/15/definitely-show-this-movie-to-your-children-baba-ramdev-extends-support-to-mahaprabhu-jagannath-set-for-nationwide-release-on-july-17/
आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “आमचे मित्र, मीडिया (Media) आणि हितचिंतकांनो, खूप विचारांती आम्ही दोघांनी परस्पर संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने सहपालकत्व (Co-parenting) निभावत राहू.”
View this post on Instagram
यासोबतच त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर कायम असल्याचंही स्पष्ट केलं. “एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर राहील. गेल्या अनेक वर्षांत मीडिया आणि चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यातही तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील, अशी अपेक्षा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
शेवटी दोघांनी त्यांच्या खासगी आयुष्याचा (Privacy) आदर करण्याची विनंती केली आहे. “आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा. या विषयावरील हेच आमचं एकमेव अधिकृत वक्तव्य (Official Statement) असेल. यानंतर आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा चर्चा करणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांकडून दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.