Home ब्रेकिंग न्यूज Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

0
Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!
Malaria in Mumbai

एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजारांहून अधिक आळ्या सापडल्या

३६ लाख ८१ हजार लोकांचा सर्वे, १० लाखांहून अधिक रक्ताची तपासणी

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून मागील सात महिन्यांत मुंबईत मलेरिया (Malaria) ३,६८१, डेंग्यू (Dengue) ९३८, लप्टोच्या (Lepto) १५७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा पाऊस कमी पडला असताना साथीच्या आजारांचे थैमान घातले आहे. मुंबईत (Mumbai) ३६ लाख ८१ हजार ६८३ नागरिकांचा सर्वे केला असून १० लाख ४७२ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. यामध्ये मागील वर्षीच्या म्हणजे २०२५च्या तुलनेत डेग्यू आणि मलेरिया यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आल्याने एकप्रकारे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आली आहे.

दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजार ३८२ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. त्यामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोने थैमान घातले आहे. यंदा जून (June) महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वरुणराजाची दमदार इनिंग सुरु आहे. जुलै महिन्यापासून पावसाची दमदार इनिंग झाली आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जानेवारी ते १४ जुलै २०२६ पर्यंत मलेरिया – ३,,६८१ डेंग्यू – ९३८, लेप्टो – १५७, गॅस्ट्रो – ३,८६६ कावीळ – चिकुनगुनिया – ३१ व स्वाईन फ्लू – ११३ रुग्ण आढळले आहेत.

https://prahaar.in/2026/07/16/tree-plantation-trees-affected-by-the-project-will-now-be-replanted-within-mumbai-itself/

जुलै महिन्याच्या गेल्या दोन आठवड्यात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाल्याने मुंबईत मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू , गॅस्ट्रो धोका वाढला आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. तीन हजारांहून अधिक बांधकाम ठिकाणची झाडाझडती घेतली. यात ५४ हजार ७६३ मजुराची रक्ताचे नमुने तपासले असता ३७ मजुरांना मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

अशी झाली रुग्णांची नोंद

जानेवारी ते जुलै २०२६

मलेरिया : ३,६८१

डेंग्यू : ९३८

लेप्टो : १५७

गॅस्ट्रो : ३,८६६

एच १एन१ : ११३

चिकनगुनिया – ३१

कोविड – १९ – ७१

मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आळ्या

अनोफिलीस – ५,३४१

डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत, एडिस – २२ हजार ४१

अडगळीचे सामान व टायर काढले – ६६, ५९५

https://prahaar.in/2026/07/16/mumbai-illegal-debris-adopting-the-delhi-pattern-for-unauthorized-debris-construction-waste-will-now-go-directly-to-the-cd-construction-and-demolition-waste-plant/

काय काळजी घ्याल…

साबण आणि पाण्याने वारंवार हाथ धुणे.

योग्य आहार व आराम करणे,

अति जोखमीच्या व्यक्ती विशेषतः कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदाः कॅन्सर, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यावी.

नागरिकांनी ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतः औषधे घेणे टाळा आणि घराजवळच्या पालिकेच्या आरोग्यकेंद्र, दवाखाना व रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here