Home महाराष्ट्र नाशिक Nashik : कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा धडाका, आणखी १३ परवाने निलंबित

Nashik : कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा धडाका, आणखी १३ परवाने निलंबित

0
Nashik : कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा धडाका, आणखी १३ परवाने निलंबित

Nashik : नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत कृषी विभागाने केलेल्या कारवाईत खत विक्रीचे ९०, बियाणे विक्रीचे १०, कीटकनाशक विक्रीचे १२ असे एकूण ११२ परवाने निलंबित केले आहेत. ४२ परवाने कायस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. या संदर्भात चार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/07/15/supriya-sule-we-will-consider-extending-support-if-the-total-number-of-lok-sabha-seats-is-increased-by-50-percent/

नेमकं प्रकरण काय ?

नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने विशेष तपासणी मोहिम राबवली. मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये (Agricultural Service Centre) होत असलेले नियमांचे उल्लंघन जसे की शेतकऱ्यांच्या देयकावर स्वाक्षरी न घेणे, इ-पॉस साठ्यातील अनियमितता, भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, ‘एम’ अर्जातील देयके न देणे अशा काही गंभीर त्रुटी आढळून आल्या.

गंभीर त्रुटी असल्याकारणाने कृषी विभागाकडून संबंधित केंद्रचालकांना नोटिसा (Notices) बजावून सुनावणी घेण्यात आली. संबंधित केंद्रचालकांकडून असमाधानकारक खुलासे आढळल्याने संबंधित १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित (Agro-service center licenses suspended) करण्यात आले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची किंवा जादा दराने विक्री होऊ दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, अशी माहिती कारवाई परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (Ravindra Mane) यांनी दिली.

https://prahaar.in/2026/07/15/another-shocking-video-has-surfaced-of-hooligans-attacking-tourists/

शेतकऱ्यांना आवाहन

अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी लूट आणि फसवणूक पाहता कृषी विभागाकडून (Agriculture Department) शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच ((Authorized Agricultural Service Centre))  बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत महत्त्वाचे म्हणजे खरेदीची पक्की पावती घ्यावी तसेच ‘फार्मर आयडी’द्वारेच खत खरेदी करावी. कोणत्याही केंद्राकडून नियमभंग होत असल्यास संबंधित कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ७८२१०३२४०८ या जिल्हास्तरीय व्हॉट्सॲप क्रमांकावर (WhatsApp number) तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here