Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत ‘सह अध्यक्षां’ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत ‘सह अध्यक्षां’ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

0
Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत ‘सह अध्यक्षां’ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय
Chandrashekhar Bawankulee

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ९१ विधानसभा क्षेत्र स्तरीय समित्यांमध्ये ‘सह अध्यक्ष’ पदाची अधिकृत नेमणूक करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

https://prahaar.in/2026/07/15/koliwadas-in-sai-to-get-gaothan-status/

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांची कामे सुलभ पद्धतीने आणि जलद गतीने व्हावीत यासाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एका ‘सह अध्यक्षा’ची निवड करण्याचे अधिकार महसूल मंत्री यांना देण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या विचाराधीन असलेल्या बाबीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून ९१ विधानसभा मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधी व मान्यवरांची सह अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त सह अध्यक्षांचा समित्यांमध्ये समावेश करून पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई तातडीने करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here