Home महाराष्ट्र नाशिक Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच बसणार ! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेली मालमत्ता ‘शासनजमा’ होणार

Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच बसणार ! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेली मालमत्ता ‘शासनजमा’ होणार

0
Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच बसणार ! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेली मालमत्ता ‘शासनजमा’ होणार

Shalarth ID Scam : नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणेने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून बोगस आयडीच्या (Fake ID) माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितांच्या त्या १६० कोटींच्या अपहारातून घेतलेल्या मालमत्ता ‘शासनजमा’ होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/07/14/fifa-world-cup-2026-mbappe-makes-history-breaks-five-major-records-at-the-2026-fifa-world-cup/

तपास यंत्रणेकडून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात

नाशिक शहर पाेलिसांच्या (Nashik City Police) विशेष तपास पथकाचे (एसआयटी) सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि इओडब्ल्यूचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी घोटाळ्यात ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आता तपासाचा मोर्चा संशयितांच्या काळया कमाईकडे वळवला आहे. संशयितांनी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांतून नाशिक व परिसरात बंगले, फार्म हाऊस, सोने, जमिनी आणि महागड्या गाड्या खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे आर्थिक व्यवहार नेमके कुठून, कसे आणि किती कोटींचे झाले, यासाठी बँकांकडून संशयितांच्या खात्यांचे तपशील मागवण्यात आले आहेत. ​

गुन्हे शाखेचा तपास तीव्र हाेत असल्याने संशयितांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत तब्बल दाेन हजार संशयित निष्पन्न झाले असून १६ जणांविरुद्ध सबळ पुरावे आहेत. पोलीस कारवाईच्या भीतीने तब्बल २९ संशयितांनी नाशिक सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी धाव घेतली आहे.

https://prahaar.in/2026/07/14/the-government-will-now-bear-the-cost-of-re-sowing/

जामीनासाठी धाव, जामीन अर्ज प्रलंबित 

या प्रकरणात मिनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनिष कदम, शशिकांत हिंगोनेकर, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देविदास महाजन, अविनाश उर्फ पप्पू पाटील, मनोज पाटील, शरद शिंदे, तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचे जामीन अर्ज नाशिकरोड सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत तर गुलाब ठाकरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गणेश पाटील, निखिल देशमुख, विलास जोशी, अविनाश देशमुख, बाजीराव पाटील, तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, उदय पंचभाई, शरद शिंदे, अजय टिकर, सुधाकर वारूळे, लक्ष्मण मोहणे, पुरूषोत्तम धनगर यांचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय प्रलंबित आहेत.

https://prahaar.in/2026/07/14/international-agricultural-market-to-be-set-up-near-vadhavan-port-on-the-lines-of-paris/

प्रशांत वाडिले पोलिस कोठडीत

दरम्यान, या प्रकरणात नितीन उपासनी (सेवानिवृत्त अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ – सध्या कारागृहात), भाऊसाहेब चव्हाण (तत्कालीन शिक्षण उपसंचालक) नितीन बच्छाव (तत्कालीन शिक्षणाधिकारी), यांसह वेतन पथक अधीक्षक आणि काही संशयित शिक्षक यांच्या मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बनावट (Fake) आदेशांवर उपसंचालकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणून देणारा आणि २० ते ३५ लाख रुपये उकळणारा मुख्य एजंट प्रशांत वाडिले (रा. धुळे) सध्या पोलिस कोठडीत आहे. तपासादरम्यान वाडिलेच्या धुळ्यातील सुमारे तीन कोटींच्या आलिशान बंगल्याची माहिती समोर आली असून, हा बंगला सील करून शासनजमा करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. वाडिलेने उकळलेले कोट्यवधी रुपये शिक्षण विभागातील कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले, याचाही शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here