मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे निवेदन देत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलैच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत सूचीमध्ये नव्याने समावेश करण्याची मागणी केली आहे.
https://prahaar.in/2026/07/14/srirampur-hotelier-murdered-following-a-minor-dispute-over-a-food-order/
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या सूचीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले आहे. ( Ajit dada Pawar)
https://prahaar.in/2026/07/14/government-positive-about-setting-up-a-state-of-the-art-communication-system-for-fishermens-safety-minister-nitesh-rane/
यासंदर्भात २०२६ सालातील शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये २२ जुलैचा समावेश करून आवश्यक सुधारित परिपत्रक तातडीने जारी करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना त्याबाबत सूचना देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.