Raigad Crime : रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटनेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिया सागर वाघमारे असे मृत बालिकेचे नाव आहे.
https://prahaar.in/2026/07/14/special-registration-drive-for-dashavatar-artists-in-sindhudurg-district/
प्राथमिक माहितीनुसार, रिया बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. (Raigad)
https://prahaar.in/2026/07/14/include-the-late-ajitdada-pawars-birth-anniversary-in-the-list-of-official-birth-anniversary-programs-bhujbal-and-mushrif-urge-the-chief-minister/
या प्रकरणात पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अपहरण (Kidnapping) आणि हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे पाटनेश्वर आदिवासी वाडीसह संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा पसरली आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (Crime News)