तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
बाळापूर : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाडयाच्या घरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी प्रेमाचे खोटे स्वप्न दाखवून तिला प्रेमाच्या जाळयात ओढलं. संबंधित तरुणीने लग्नाची मागणी केल्या वर पोलीस कर्मचाऱ्याने विवाह करण्यास नकार दिल्याने तिला मानसिक धक्का बसला. या तणावाखाली येऊन तिने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.(Balapur)
https://prahaar.in/2026/07/13/ind-vs-eng-the-odi-series-against-england-is-unrelated-to-the-t20-defeat-gill-outlines-his-strategy-for-the-2027-world-cup/
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणीच्या वडिलांनी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. वडिलांनी सांगितलं की संबंधित कर्मचारी आमच्या घरात भाड्याने राहत होता. पवन वडगावे असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने आधी माझ्यामुलीशी प्रेमाचं खोट नाटक केल आणि लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर त्याने विवाह करण्यास नकार दिला. या घटनेमुळे ती खूप दिवस मानसिक तणावाखाली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला.(Crime News)
https://prahaar.in/2026/07/13/changes-will-be-made-to-the-laws-governing-mathadi-hamal-and-manual-laborers/
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी पोलीस कर्मचारी दोन-तीन दिवसांपूर्वी सुटी घेऊन पसार झाला आहे. बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असून, त्याच्या नातेवाईकांकडे आणि संपर्कातील लोकांकडे कसून चौकशी सुरू आहे.