मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)
https://prahaar.in/2026/07/13/shocking-young-woman-dies-under-suspicious-circumstances-at-an-andheri-lodge-police-investigation-underway/
नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून, जनतेच्या पाठिंब्यामुळे भविष्यात ते अव्वल स्थान गाठतील. राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्यांना सातत्याने जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ( CM Devendra Fadnavis)
यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळातील अटल सेतू, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांचा उल्लेख केला. तसेच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
https://prahaar.in/2026/07/13/bmc-crackdown-on-those-illegally-dumping-debris-in-mumbai/
लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि काँग्रेसवर निशाणा साधत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीत दिलेले दरमहा २१०० रुपयांचे आश्वासनही सरकार पूर्ण करेल, असे ते म्हणाले.
राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका करत, समाजवादी पक्ष आणि काँग्रेससोबतची युती करताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. (Maharashtra Politics)
याशिवाय, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केल्याचा उल्लेख करत, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या एकटा पडत असल्याचाही दावा नवनाथ बन यांनी केला. (Politics)