Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर; हिंदू तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा – मंत्री नितेश राणे

Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर; हिंदू तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा – मंत्री नितेश राणे

0
Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर; हिंदू तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा – मंत्री नितेश राणे

शिर्डी : अभिनेता आमिर खान (Amir Khan) हा लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचा आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. हिंदू समाजातील तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शनिवारी ११ जुलै शिर्डी येथे श्री साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंत्री नीतेश (Nitesh Rane) राणे त्यांच्या सोबत आले होते. भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. साई दर्शनानंतर मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, हिंदू समाजाने, विशेषकरून तरुणांनी हा विचार करण्याची खूप गरज आहे की ते कोणाला आपला आदर्श मानत आहेत. जेव्हा मोठे सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित निर्णय घेतात, तेव्हा त्याचा परिणाम समाजावरही होतो. जे हिंदू तरुण त्यांना सेलिब्रिटी मानतात, त्यांनी त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यावी याचा विचार केला पाहिजे. जेव्हा असे लोक त्यांच्या आयुष्याबद्दल निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजानेही याचा विचार केला पाहिजे. लव्ह जिहादचा (Love Jihad) ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे? आमिर खान बनत नाही का? हिंदू तरुणांनी काळजीपूर्वक ठरवलं पाहिजे की त्यांनी कोणाचे चित्रपट पहावेत आणि त्यांना किती पाठिंबा द्यावा.

https://prahaar.in/2026/07/12/amit-satam-demands-installation-of-trash-booms-on-all-drains-flowing-into-the-sea-writes-to-mayor-and-commissioner/

दरम्यान राम मंदिर देणगी चोरीबद्दल बोलणारे हज घोटाळ्यावर गप्प का? इतर धार्मिक संस्थांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांवर ते का बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर हल्लाबोल केला.

https://prahaar.in/2026/07/12/new-direction-for-india-new-zealand-relations-goal-to-double-trade-strategic-partnership-agreement-sealed/

अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) नुकताच गौरी स्प्रॅटशी तिसरा विवाह झाला. आमिरच्या या तिसऱ्या लग्नावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघींना घटस्फोट दिल्यानंतर त्याने गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. आमिरच्या आधीच्या दोन्ही पत्नी आणि आता तिसरी पत्नीही हिंदू आहेत. बजरंग दलानेही शनिवारी आमिर विरोधात आंदोलन करत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here