Home ब्रेकिंग न्यूज Moshi Building Collapse : मोशीत काळाचा घाला! दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू

Moshi Building Collapse : मोशीत काळाचा घाला! दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू

0
Moshi Building Collapse : मोशीत काळाचा घाला! दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू
Moshi 9 Deaths

मोशी (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो (Moshi Garbage Depot) येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. चौथ्या दिवशी सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान (Search Operation) दुर्घटनाग्रस्त इमारतीत आणखी सात जण मृतावस्थेत आढळले. दरम्यान, इमारतीतील बचावकार्य (Rescue Operation) पूर्ण झाले असून इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली.

८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste to Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. या घटनेत इमारतीत २२ आणि बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली एक अशा एकूण २३ जण अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

https://prahaar.in/2026/07/12/ind-w-vs-eng-w-indian-womens-team-deals-a-massive-blow-to-england-firm-grip-on-the-match-by-the-end-of-day-2/

यानंतर भारतीय सेना (Indian Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य (Rescue Operation) हाती घेतले. दुर्घटनेच्या पहिल्याच दिवशी नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. मात्र ९ जुलै रोजी भावेश वाणी यांना बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत धोकादायक आणि अस्थिर असल्याने बचावपथकाला (Rescue Team) आत प्रवेश करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे इमारतीभोवतीचा मलबा हटवण्यासाठी १२ पोकलेन, जेसीबी (JCB) आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले. त्यानंतर दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्स्कॅव्हेटर (Demolition Excavator) मशीन घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग हटवून बचाव पथकाने आत प्रवेश केला.

https://prahaar.in/2026/07/12/fifa-world-cup-2026-bellingham-proves-to-be-the-game-changer-england-beats-norway-2-1-in-extra-time/

चौथ्या दिवशी दिवसभर सुरू असलेल्या शोधमोहीमेत (Search Operation) अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड (३५) हे सात जण इमारतीत मृतावस्थेत आढळले. सर्वांना तातडीने पिंपरीतील वायसीएम (YCM) रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर (Medical Examination) त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या सात जणांसह आणि यापूर्वी मृत घोषित करण्यात आलेल्या दोघांचा मिळून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकासह (Dog Squad) विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here