व्हिएतनाम : व्हिएतनामच्या दक्षिणेकडील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या बोटीत ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी असे एकूण ३६ जण प्रवास करत होते. (Vietnam Boat Accident)
स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, ही स्पीडबोट हॉन मे रट बेटावरून अन थोई बंदराच्या दिशेने जात असताना किनाऱ्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर समुद्रात उलटली. दुर्घटनेच्या वेळी समुद्रात लाटा उंच उसळत होत्या आणि हवामान प्रतिकूल असल्याचे सांगितले जात आहे. (Vietnam Boat Accident)
https://prahaar.in/2026/07/11/karnataka-school-poisoning-suspected-food-poisoning-at-a-school-in-karnataka-over-15-students-hospitalized/
भारतीय दूतावासाची पुष्टी :
या दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदन जारी करत भारतीय पर्यटकांची बोट उलटल्याची पुष्टी केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू असून, दुर्घटनेबाबतची नेमकी माहिती गोळा केली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. (Vietnam Boat Accident)
कुटुंबीयांसाठी नियंत्रण कक्ष सुरू :
दुर्घटनेनंतर प्रभावित कुटुंबीयांना मदत आणि माहिती देण्यासाठी भारतीय दूतावासाने हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे विशेष नियंत्रण कक्ष (Control Room) सुरू केले आहेत. या नियंत्रण कक्षांमार्फत मृत आणि जखमींबाबतची माहिती तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Vietnam Boat Accident)
https://prahaar.in/2026/07/11/india-is-not-just-a-market-but-a-launchpad-for-global-development-pm-modi/
शोधमोहीम अद्याप सुरू :
लोकप्रिय पर्यटनस्थळावर शोककळा :
फु क्वोक हे व्हिएतनाममधील सर्वात मोठे बेट असून, जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो भारतीय पर्यटकही येथे पर्यटनासाठी येतात. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून भारतीय पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Vietnam Boat Accident)
View this post on Instagram