पाचगणी: इंदापूर येथील एका पर्यटकाची पाचगणी परिसरातील भोसे खिंड येथे लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत हॉटेलच्या परिसरात एका घरात डोकावून पाहिल्याच्या किरकोळ कारणावरून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या सात तासांत या प्रकरणातील चारही संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/11/house-searched-after-the-death-of-don-baba-farjan-a-massive-haul-worth-crores-seized/
काय आहे प्रकरण?
मृत युवक अक्षय रमेश जाधव (वय २७, रा. भिगवण, ता. इंदापूर) हा ८ जुलै रोजी आपल्या काही मित्रांसह पाचगणी येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्वजण भोसे खिंड येथील ‘अतिथी व्हेज-नॉनव्हेज’ हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. याच दरम्यान हॉटेल परिसरात दारूच्या नशेत असलेल्या अक्षयने एका स्थानिक घरामध्ये डोकावून पाहिले. याच गोष्टीचा राग मनात धरून स्थानिक रहिवासी आणि काही साथीदारांनी अक्षयला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
https://prahaar.in/2026/07/11/wedding-bells-to-ring-again-in-the-pawar-family-parth-pawar-set-to-tie-the-knot-soon/
पोलिसांनी केली सात तासांत कारवाई
मृताचा मित्र विशाल अजित जाधव याने बारामती शहर पोलीस ठाण्यात सुरुवातीला फिर्याद नोंदवली होती, त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि केवळ सात तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले.
https://prahaar.in/2026/07/11/jalgaon-the-corrupt-district-stamp-collectors-misdeeds/
अटक करण्यात आलेले संशयित: १. सूर्यकांत चंद्रकांत गोळे (वय ३७, रा. भोसे खिंड) २. अविनाश सतीश भोसले (वय ३१, रा. बावधन, वाई) ३. राहुल जनार्दन राजपुरे (वय ३७, रा. कणूूर, वाई) ४. अमोल गेणदेव वाडकर (वय ३६, रा. चिखली, वाई)
न्यायालयाने या चारही आरोपींना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पाचगणीसारख्या शांत पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.