Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon : पोलिसांसमोरच राडा, पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचाही फुटल्या; प्रेम प्रकरणाचे नाट्यमय वळण

Jalgaon : पोलिसांसमोरच राडा, पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचाही फुटल्या; प्रेम प्रकरणाचे नाट्यमय वळण

0
Jalgaon : पोलिसांसमोरच राडा, पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचाही फुटल्या; प्रेम प्रकरणाचे नाट्यमय वळण

Jalgaon : पोलिसांसमोरच जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Stations) दोन गटांनी मारामारी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून विवाहानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तरुण-तरुणीच्या प्रेम प्रकरणाने हे नाट्यमय वळण घेतले. याबाबत दोघांच्याही कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ घातला.

https://prahaar.in/2026/07/11/torrential-rain-wreaks-havoc-in-kasara-ghat-protective-wall-collapsed-highway-develops-cracks-traffic-reduced-to-one-lane/

नेमकं प्रकरण काय ?

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. या कारणास्तव दोघांनी काही दिवसांपूर्वी घर सोडले. त्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने विवाह केला. विवाहानंतर भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये तसेच कायदेशीर संरक्षण मिळावे या उद्देशाने दोघांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. (Jalgaon News)

https://prahaar.in/2026/07/10/nashik-news-outrageous-incident-at-a-nashik-ashram-school/

पोलीस स्टेशनमध्येच मारहाण अन तोडफोड

तरुण-तरुणी प्रेमविवाह करुन पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि समर्थक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये तरुण-तरुणीच्या निर्णयावरून शाब्दिक वाद झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच हा वाद टोकाला पोहोचला आणि गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. वाद चिघळताच पोलीस ठाणे परिसरात धावाधाव सुरू झाली विशेष म्हणजे या गोंधळात पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर पोलिस ठाण्यात उपस्थित नागरिकांमध्येही घबराट पसरली. (Jalgaon News)

https://prahaar.in/2026/07/11/up-firozabad-crime-enraged-over-mothers-refusal-to-marry-18-month-old-toddler-brutally-murdered-accused-sentenced-to-death-in-just-40-days/

राजकीय गटांमुळे वाढला तणाव

महत्त्वाचे म्हणजे या घटनेत एका विद्यमान नगरसेवकाशी संबंधित गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याशी संबंधित गट समोरासमोर आल्याने हा वाद आणखीनच चिघळल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि बाचाबाची झाल्याने तणाव आणखी वाढला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही गटांना वेगळे करण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. (Jalgaon News)

https://prahaar.in/2026/07/11/gold-silver-rates-today-gold-and-silver-prices-have-risen-again-fares-have-increased-for-the-second-consecutive-day-check-the-new-prices-in-your-city-before-buying/

प्रेमविवाह करणारे तरुण-तरुणी सज्ञान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह केलेले तरुण आणि तरुणी हे दोघेही सज्ञान असून त्यांनी स्वतःच्या इच्छेने विवाह केला आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान या गोंधळात पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here