Home महाराष्ट्र नाशिक Nashik : ‘हे सर्व आरोप हास्यास्पद’, ‘ऑपरेशन टायगर’वर शिवसेनेतील नेत्याचं मोठं विधान

Nashik : ‘हे सर्व आरोप हास्यास्पद’, ‘ऑपरेशन टायगर’वर शिवसेनेतील नेत्याचं मोठं विधान

0
Nashik : ‘हे सर्व आरोप हास्यास्पद’, ‘ऑपरेशन टायगर’वर शिवसेनेतील नेत्याचं मोठं विधान

Nashik :राज्यात झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’ प्रमाणेच नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाच्या 15 नगरसेवकांनी एकत्र येत, 5 कोटी रुपयांच्या निधीचे आमिष दाखवून ‘एजंट’ माध्यमातून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. या आरोपांना आता शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

https://prahaar.in/2026/07/10/milk-collection-drops-by-25-percent-after-tukaram-mundes-action/

अजय बोरस्ते काय म्हणाले ?

अजय बोरस्ते (Ajay Boraste) म्हणाले की, “हे सर्व आरोप आरोप हास्यास्पद आहे, यातून त्याच्या पक्षातील अस्वस्थता समोर येत आहे. आमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. कोण एजंट आहे, कोण आमची वकिली करतो हे आम्हालाही कळू द्या, आम्ही शोध घेऊ. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या कामांकडे बघून कोणीही आले तर सांगता येत नाही. आमच्यावर आरोप करून त्यांची अस्वस्थता बाहेर येत आहे. राज्यभरात प्रवेश होत आहे, त्यात नाशिकमध्ये काही प्रवेश झाले तर आश्चर्य वाटायला नको. उबाठाच्या लोकांनी गोकुळ गिते यांना मतदान केले, आता त्यांच्या माध्यमातून काही झाले तर माहिती नाही. एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यांच्याकडे घोडेबाजार चालत नाहीत. गोकुळ गिते यांनी यांना उबाठाने मतदान केले ते आता शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, त्यामुळे कुच्छ भी हो सकता है,” असे त्यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here