Home महाराष्ट्र नाशिक Nashik : खड्डेमुक्त नाशिकसाठी महापालिकेचा ३० कोटींचा आराखडा

Nashik : खड्डेमुक्त नाशिकसाठी महापालिकेचा ३० कोटींचा आराखडा

0
Nashik : खड्डेमुक्त नाशिकसाठी महापालिकेचा ३० कोटींचा आराखडा

Nashik : नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच, महापालिकेने (Nashik Municipal Corporation) रस्ते दुरुस्ती आणि देखभालीसाठी तब्बल ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक डांबरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

https://prahaar.in/2026/07/10/nashik-the-old-mans-house-was-usurped-by-rebirth-of-the-dead/

पालिकेच्या ३१ प्रभागांमध्ये स्वतंत्र निविदा

या पार्श्वभूमीवर महापालिकेने (Nashik Municipal Corporation) अल्पकालीन निविदा प्रक्रिया सुरू केली असून, पुढील पंधरा दिवसांत प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. शहरातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांना प्राधान्य देऊन दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागांमध्ये स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांची नियुक्ती करून तातडीने कामाचे आदेश दिले जाणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/07/10/indias-us-treasury-holdings-at-a-6-year-low-rbi-places-a-big-bet-on-gold/

रस्त्यांची मोठी दुरावस्था

सलग पाच ते सहा दिवस झालेल्या पावसानंतर शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विविध भागांमध्ये खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

कुंभमेळा विकास आराखड्याअंतर्गत शहरातील २८ प्रमुख रस्त्यांवर काम सुरू आहे. अनेक ठिकाणी एका बाजूचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूवरूनच दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे. मात्र, या खुल्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक संथ झाली असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

https://prahaar.in/2026/07/10/what-did-the-court-say-while-granting-bail-to-nida-khan/

आश्रम शाळेत संतापजनक घटना

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कळवण येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत (Mohandari Government Tribal Residential Ashram School) शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने चक्क एका बाळाला जन्म दिला आहे.

या गंभीर प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा आणि देखरेखीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. आश्रमशाळेत एवढा गंभीर प्रकार घडतोच कसा असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Kalwan Police Station) तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here