Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कामगार पथके रवाना

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कामगार पथके रवाना

0
Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कामगार पथके रवाना
nitesh rane (3)

मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत निर्णय; आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अपर मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात वादळामुळे वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सातारा, बारामती आणि सांगली येथून विशेष कामगार पथके सिंधुदुर्गात पाठविण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा (Sachin Chandra) यांच्यासमवेत मंत्रालयात पार पडलेल्या विशेष आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

https://prahaar.in/2026/07/09/those-who-stay-at-home-and-mumbai-bjp-hits-back-at-raj-thackerays-criticism/

एल-निनोच्या वाढत्या प्रभावामुळे हवामानात होणारे अनपेक्षित बदल लक्षात घेऊन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि तांत्रिक उपकरणांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करून कोणत्याही संकटाला तात्काळ प्रतिसाद देता येईल, अशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही यंत्रणेला देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम जिल्हा असून येथे दरवर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका बसतो, हे लक्षात घेऊन पावसाळा सुरू झाल्यानंतर धावपळ करण्याऐवजी दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच आवश्यक नियोजन आणि पूर्वतयारी सुरू ठेवावी, अशा सूचना अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी बैठकीत दिल्या.(Sindhudurg)

https://prahaar.in/2026/07/09/ajit-pawar-confer-the-padma-vibhushan-upon-the-late-deputy-chief-minister-ajit-pawar/

ज्या दुर्गम किंवा किनारपट्टीच्या भागात वारंवार वीज यंत्रणेचे नुकसान होते, त्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कोकण मंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये आणि सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here