Home ब्रेकिंग न्यूज US Iran Conflict : सीजफायरनंतर पुन्हा भडकला संघर्ष; अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले, मध्य पूर्वेत तणाव वाढला

US Iran Conflict : सीजफायरनंतर पुन्हा भडकला संघर्ष; अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले, मध्य पूर्वेत तणाव वाढला

0
US Iran Conflict : सीजफायरनंतर पुन्हा भडकला संघर्ष; अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले, मध्य पूर्वेत तणाव वाढला

US Iran Conflict : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून, सीजफायर कोलमडल्यानंतर अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन लष्कराने होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील इराणच्या लष्करी क्षमतेला लक्ष्य करत कारवाई सुरू केल्याची माहिती दिली आहे. (US Iran Conflict)

https://prahaar.in/2026/07/08/overall-rainfall-deficit-in-the-country-stands-at-24-percent-kharif-sowing-completed-on-350-lakh-hectares-so-far/

मिळालेल्या माहितीनुसार, बंदर अब्बास, सिरिक, कोनारक आणि चाबहार परिसरात अनेक स्फोट झाले. हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून किनारी भागातील लष्करी तळ, रडार केंद्रे, क्षेपणास्त्र तळ आणि नौदलाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला आहे.  (America Iran Airstrike)

https://prahaar.in/2026/07/08/mamata-banerjee-major-setback-for-trinamool-congress-ed-freezes-deposits-worth-%e2%82%b9440-crore/

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) होर्मुझ सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम राबविल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, इराणने या कारवाईचा तीव्र निषेध करत अमेरिकेच्या या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून जागतिक तेलपुरवठा आणि सागरी वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Middle East Crisis)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here