पुणे : पुणे (Pune) जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर (Bhimashankar) तीर्थक्षेत्राचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. भीमाशंकरकडे जाणारे आंबेगाव आणि खेड तालुक्यातील दोन्ही प्रमुख मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली असून पर्यटकांना प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Bhimashankar Road Close)
https://prahaar.in/2026/07/08/first-floor-of-a-building-collapses-in-wadala-three-sustain-minor-injuries/
खेड तालुक्यातील राजगुरुनगर–भीमाशंकर मार्गावरील गुंडाळवाडी येथील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक वाहने मार्गातच अडकली असून पुढील प्रवास अशक्य झाला आहे.
दुसरीकडे, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरकडे जाणारा मार्गही सकाळपासून घोडेगाव येथे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणारे दोन्ही प्रमुख रस्ते बंद झाल्याने परिसराचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. (Heavy Rain Maharashtra)
https://prahaar.in/2026/07/07/ram-kadam-my-mother-lost-her-life-because-of-pigeons/
सततच्या पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अत्यावश्यक कामाशिवाय भीमाशंकरकडे प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.