पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण केली आहे. (Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026)
महापालिकेच्या नियोजनानुसार बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होणार असून, पालखीचा शहरात मुक्काम राहणार आहे. त्यानंतर गुरुवार, ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता आळंदी–दिघी रोडवरील मॅगेझीन चौक, भोसरी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी प्रमुख प्रवेशद्वारांवर आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून मुक्कामाच्या ठिकाणी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. (Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026)
https://prahaar.in/2026/07/06/warkaris-face-inconvenience-in-alandi-due-to-indrayani-river-flooding-mumbai-dabbawalas-to-arrange-for-meals-and-accommodation/
पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यालय आणि वसंतदादा पाटील विद्यालय येथे दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, तेथील पिण्याचे पाणी, स्नानगृहे, स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर सुविधांची त्यांनी तपासणी केली. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026)
https://prahaar.in/2026/07/06/indrayani-river-floods-government-issues-important-appeal-to-warkaris-administration-urges-people-not-to-visit-alandi/
महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, अखंडित पाणीपुरवठा, फिरती शौचालये, वैद्यकीय सेवा, स्नानगृहे, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भाविकांसाठी सुलभ वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. (Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026)
View this post on Instagram