Home क्राईम Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

0
Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Blast) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत विशेष न्यायालयाने २०२२ मध्ये सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाने ३८ दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा आणि ११ दोषींची जन्मठेप कायम ठेवत दोषींच्या सर्व अपील याचिका फेटाळून लावल्या.

या प्रकरणाची सुनावणी विशेष खंडपीठासमोर झाली. मार्च २०२५ पासून नियमित सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज निकाल जाहीर करत विशेष न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Ahmedabad Serial Blasts)

https://prahaar.in/2026/07/07/a-landslide-occurred-in-the-old-kasara-ghat-on-the-nashik-mumbai-highway/

न्यायालयाने पीडित कुटुंबियांनाही दिलासा देत बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Gujarat High Court)

यापूर्वी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात ३८ दोषींना फाशी आणि ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. भारतीय कायद्यानुसार, कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतरच अंमलात येऊ शकते. त्यानुसार हे प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात प्रलंबित होते. (Ahmedabad serial blasts verdict)

https://prahaar.in/2026/07/07/immediate-aid-for-flood-victims-not-a-single-affected-person-will-be-left-out-minister-chandrashekhar-bawankule/

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे २००८ मधील भीषण साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तब्बल १८ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here