Home ब्रेकिंग न्यूज Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

0
Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीतील अभिनय स्कूल ते नवले ब्रिज या मार्गावर आता सर्वसामान्य वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. (Pune News)

सध्या पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार हा आदेश लागू केला आहे. ( Navale Bridge traffic rule)

https://prahaar.in/2026/07/07/pravin-darekar-urges-gadkari-regarding-the-dapoli-poladpur-mahabaleshwar-national-highway/

अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या वेगमर्यादेतून सूट देण्यात आली आहे. या मार्गावरील यापूर्वीचे सर्व वेगमर्यादा आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, वाहतूक चिन्हांकडे लक्ष द्यावे आणि स्पीडोमीटर नियमित तपासावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/24/a-national-park-in-the-tilari-valley-along-the-lines-of-vantara/

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे (Palkhi Sohala) ९ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) आळंदी रस्ता कार्यालयातील वाहन तपासणी आणि ड्रायव्हिंग लायसन्स चाचण्या होणार नाहीत. आयडीटीआरकडे जाणारे मार्ग बंद राहण्याची शक्यता असल्याने तेथील कामकाजावरही परिणाम होणार आहे. (Maharashtra News)

९ जुलै रोजी ज्यांची वाहन तपासणी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीची अपॉइंटमेंट आहे, त्यांना १० ते २० जुलै २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी चाचणी देता येणार आहे. ९ जुलैची अपॉइंटमेंट वैध राहणार असल्याचे RTO प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here