Home महाराष्ट्र नाशिक Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

0
Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन
TCS Nida khan

Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा एजाज खान हिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Nashik TCS Case Nida Khan)

आरोपी गर्भवती असून तिची प्रकृती गंभीर असल्याचा मुद्दा तिच्या वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मानवी दृष्टिकोन व आरोग्यस्थितीचा विचार करून न्यायालयाने हा जामीन दिल्याचे समजते. (Nashik TCS Case Nida Khan)

https://prahaar.in/2026/07/06/nashik-cyber-police-uncover-%e2%82%b95-45-crore-job-scam/

दरम्यान, या गुन्ह्यातील सहआरोपी तौसिफ अत्तार याच्यावर विनयभंगाचा आरोप असल्याने त्यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, बलात्काराचा गंभीर आरोप असलेल्या मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे. (Nashik TCS Case Nida Khan)

हे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५०० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. (Nashik TCS Case Nida Khan)

https://prahaar.in/2026/07/06/tet-exam-paper-leak-big-development-in-tet-paper-leak-case-all-four-accused-remanded-in-judicial-custody-till-july-18/

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांनी आश्रय दिल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. (Nashik TCS Case Nida Khan)

सध्या एसआयटीच्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here