साप्ताहिक भविष्य, ५ जुलै २०२६ ते ११ जुलै २०२६
![]() |
चांगली बातमी समजणार आहेमेष : आपले घरच्यांशी संबंध चांगले राहणार आहेत. व्यापार व्यवसायामध्ये भागीदार यांची संबंध चांगले संबंध ठेवल्याने व्यापार व विस्तार करणार आहात.काही जुन्या मित्रांची भेटीगाठी होऊ शकतात.प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शुभ ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. आपल्यामध्ये सृजनात्मक क्षमता असल्यास या कालावधीत कला-संगीत इत्यादी क्षेत्रात आपणास यश मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. संचार माध्यमातून एखादी चांगली बातमी समजणारआहे. |
![]() |
स्नेह व सन्मान आपणास मिळणार आहेवृषभ : या कालावधीमध्ये आपले प्रयत्न चांगले सफल होणार आहेत. सरकारी वरिष्ठ तसेच ज्येष्ठ व्यक्ती आई वडील यांच्याशी मधुर संबंध राहणार आहेत. एखादी मोठी यात्रा होण्याची शक्यता आहे. त्याच्या मध्ये फायदे होतील. आपले मित्र आणि सहकारी आपल्याला पूर्ण सहयोग करणार आहेत. आपलं मन अध्यात्म रमणार आहे. आपल्याला नवीन कामाच्या संधी येतील. आपले विरोधक आपले नुकसान करू शकणार नाहीत.वरिष्ठ आणि प्रबल व्यक्तींचा स्नेह व सन्मान आपणास मिळणार आहे. मात्र काही कारणांनी आपल्याला मानसिक शांती लाभणार नाही. |
![]() |
आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगामिथुन : देण्याघेण्याच्या व्यवहारात व्यापारात व्यवसाय यात खूप काळजीपूर्वक व्यवहार केले पाहिजेत. नुकसान होण्याची संभावना आहे. मित्र आपला शब्द पाळणार नाहीत. त्यामुळे सावध असावे. पण आपण आपल्या बुद्धिमत्तेने आणि निपुणतेने यश खेचून आणणारा आहात. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट घेणार आहात.विद्वान व्यक्तीच्या संपर्कात राहणार आहात. आपण नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये आपल्या कामामध्ये सुधारणा होणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. आपण यशस्वी होणार आहात आपल्या सौभाग्यात वाढ होणार आहे.
|
![]() |
आर्थिक आलेख उंचावेलकर्क : अनेक कामे एका वेळेस करण्याचा प्रयत्न करू नका कुठलेच काम नीट पणे होणार नाही. घाईगर्दीने कामे करू नका. कामामध्ये चुका होऊ नये यासाठी पूर्णपणे लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील कोणी आजारी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीची काळजी वाटणार आहे. तणावाचे वातावरण असू शकते. आपण परिस्थितीशी चांगला मुकाबला करणार आहात. कोणत्याही परिस्थितीला बुद्धिचातुर्याने समोर जाल. आपल्या अर्थार्जनात वाढ होणार आहे. घरातील उपभोग्य वस्तूंसाठी खर्च करणार आहात. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात.
|
![]() |
व्यापार व्यवसाय मध्ये विकाससिंह : आपल्या मेहनतीने आपण व्यापार व्यवसाय मध्ये विकास करणार आहात. वरिष्ठ आणि सत्ताधारी व्यक्तींची आपले चांगले संबंध राहणार आहेत. प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील. बऱ्याच दिवसापासून एखाद्या ठिकाणी जाण्याचे राहिले होते, त्या ठिकाणी आपला प्रवास होण्याची शक्यता आहे.मित्र व सहयोगी आपणास आपल्या उद्योग व्यवसायामध्ये साहाय्य करणार आहेत. व्यापार-व्यवसायात उच्च स्तरावर नेण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. मोठा भाऊ किंवा इष्टमित्र याच्या संबंधी शुभवार्ता समजणार आहे.प्रेमी युगुलांचा साठी हा कालावधी चांगला आहे. |
![]() |
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतीलकन्या : आपली इच्छा व महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. मित्र आणि नातेवाईक यांचे सहयोग आपणास मिळणार आहे. यावेळी केलेले करार सफल होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये चांगला फायदा होणार आहे. लांबचे प्रवास सुखद होतील, सफल पण होतील. परिवारामध्ये चांगले वातावरण असणार आहे. सोयी आणि सुविधा यासाठी बराच खर्च होणार आहे. आर्थिक स्वरूपासाठी हा कालावधी चांगला आहे. या कालावधीत आपण बरेच आशावादी राहणार आहात.संचार माध्यमातून एखादा शुभ समाचार आपणासाठी येऊ शकतो.
|
![]() |
आत्मविश्वासात वृद्धीतूळ : या काळामध्ये आपणास स्वतःच्या आत्मविश्वासावर आपण यश संपादित करणार आहात. सन्मान आणि प्रतिष्ठा आपणास मिळणार आहे. घरामध्ये शुभ कार्याचे आयोजन कराल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि दूरदृष्टीने आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये लाभ मिळणार आहेत. धार्मिक कृत्यांमध्ये सहभागी होणार आहात. आपल्या प्रभावशाली वाणीने आपले मत दुसऱ्याला पटवून द्याल. यामुळे आपणास आर्थिक फायदे पुष्कळ होणार आहेत. आणि व्यस्त राहणार आहात. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश असणार आहेत. |
![]() |
उत्साहवर्धक वातावरणवृश्चिक : नोकरी व्यापार आणि व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण असणार आहे.त्याचे चांगले परिणाम आपल्या समोर येणार आहे. नवीन व्यवसायात मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती साधारण चांगली असणार आहे. आपल्या कुटुंबांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असणार आहे. काही व्यक्ती आपणास खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण कुशलता पूर्वक काम करणार आहात. कुटुंबातील व्यक्तींशी चांगले संबंध असणार आहेत. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. उच्च पद प्रतिष्ठा प्रतिष्ठित व्यक्तींची भेट होईल.
|
![]() |
चांगले आणि लाभप्रद करार होतीलधनु : या कालावधीमध्ये आपण विद्वान व्यक्तींच्या संपर्कात येणार आहात. व्यापार व्यवसायात वाढ होणार आहे. तो चांगल्या प्रकारे बहरणार आहे. चांगले आणि लाभप्रद करार होतील. भागीदार आपणास चांगला सहयोग देणार आहे. मात्र कुठल्याही कागदपत्रांवर न वाचता नही करू नये. आई वडील व गुरूंचे आपणास आशीर्वाद असणार आहेत. थोडे आणखीन चांगले प्रयत्न केल्यास आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा व इच्छा पूर्ण होण्याचा कालावधी आहे.
|
![]() |
अडचणी कमी होतीलमकर : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही दिवस व्यापार व्यवसायामध्ये थोड्या अडचणी येत होत्या, पण आता त्या अडचणी कमी होतील. व्यापार व्यवसाय चांगला चालणार आहे. आपल्या व्यवसायामध्ये नवीन करार होतील त्यामध्ये आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर आणि त्यामध्ये आपली प्रतिभा दिसून येणार आहे. या करारामध्ये आपण संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहात.नोकरी करणाऱ्यांना नोकरीसाठी नवीन संधी केव्हा नोकरी मध्ये बढती मिळू शकते.आपल्या कार्यक्षेत्रात आपण रचनात्मक काम केल्यामुळे आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होणार आहेत. |
![]() |
स्पर्धांत्मक यशकुंभ : ज्या व्यक्ती सरकार दरबारी काम करत आहेत, त्यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होणार आहे.तसेच बढती किंवा पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती संचार माध्यम अभिनय क्षेत्र सिनेमा या संबंधित आहे त्यांना परदेश गमनाच्या संधी आहे. तेथे आयोजित असलेल्या या स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगले यश मिळणार आहे.सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नवीन नियोजन करणार आहात. आपल्या व्यवसायाच्या नवीन शाखा नवीन शहरांमध्ये उघडू शकता.
|
![]() |
संयम राखामीन : काही वेळेस मानहानीचे प्रसंग येऊ शकतात. अशा वेळेस आपण स्वतःला सावरले पाहिजे धैर्य राखले पाहिजे. नोकरीतील स्थिती चांगली होण्यासाठी आपण सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे काम करा. नोकरीमध्ये स्वतःचं काम असल्याप्रमाणे काम करणे, फायद्याचे ठरणार आहे.प्रेमी युगुलांसाठी हा कालावधी चांगला आहे. त्यांचे संबंध मधुर होणार आहेत. जे विद्यार्थी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिउत्तम आहे. काहींना स्कॉलरशिप पण मिळू शकते.
|











