छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने बँकेवर वर्चस्व मिळवले आहे. २० संचालक पदांपैकी १८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळत गेली. भाजपचे मंत्री अतुल सावे (Atul Save), शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार संजना जाधव आणि अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक उमेदवार विजयी झाले.
https://prahaar.in/2026/07/05/kurla-news-shocking-63-year-old-man-dies-after-tree-collapses-in-kurla/
या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित भूमिपुत्र बचाव पॅनलला मोठा धक्का बसला. या पॅनलमधून काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) हे एकमेव उमेदवार विजयी ठरले. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले काँग्रेसचे अनिल बोरसे यांनीही महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद आणखी वाढली.
या निवडणुकीत २० पैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये ७ उमेदवार महायुतीचे तर एक काँग्रेसचा होता. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी जवळपास ९९ टक्के इतकी नोंदवली गेली.
https://prahaar.in/2026/07/05/best-news-issue-regarding-best-drivers-salaries-resolved/
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढवल्याने या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. मतदानापूर्वीच महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये पडलेल्या फुटीचाही महायुतीला फायदा झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.