Home ब्रेकिंग न्यूज Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल यांच्या आजोबांचे निधन; नातवाला न्याय मिळावा म्हणून कँडल मार्चमध्ये झाले होते सहभागी

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल यांच्या आजोबांचे निधन; नातवाला न्याय मिळावा म्हणून कँडल मार्चमध्ये झाले होते सहभागी

0
Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल यांच्या आजोबांचे निधन; नातवाला न्याय मिळावा म्हणून कँडल मार्चमध्ये झाले होते सहभागी

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे (Ketan Agrawal Murder Case) आधीच शोकाकुल असलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन यांचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

देविचंद अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वीच नातू केतनला न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये सहभाग घेतला होता. थरथरत्या हातात केतनचा फोटो असलेले बॅनर घेऊन ते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणातील प्रत्येकाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. (Devichand Agrawal)

https://prahaar.in/2026/07/04/three-more-arrested-in-tet-paper-leak-case/

माध्यमांशी बोलताना त्यांनी सिया गोयलच्या कुटुंबीयांवर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोपही केला होता. केतनच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून आता देविचंद अग्रवाल यांच्या निधनामुळे कुटुंबावर पुन्हा दुःखाचे सावट पसरले आहे.

देविचंद अग्रवाल यांच्यावर शनिवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Pune Crime News)

https://prahaar.in/2026/07/04/shocking-mother-jumps-from-mandovi-express-with-one-and-a-half-year-old-child/

देविचंद अग्रवाल हे तुळजापूरमधील ज्येष्ठ उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे तुळजापूरमधील व्यापारी क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here