Home क्रीडा Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल! दुसऱ्या सामन्यात पदार्पण होणार ? चर्चांना उधाण

Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल! दुसऱ्या सामन्यात पदार्पण होणार ? चर्चांना उधाण

0
Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल! दुसऱ्या सामन्यात पदार्पण होणार ? चर्चांना उधाण

Manchester : भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (जुलै) रोजी मॅंचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात वैभवला संधी दिली जाणार की नाही ? यावर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र वैभवच्या इन्स्टा पोस्टने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.या सामन्यापूर्वी वैभवने एक खास इन्स्टा पोस्ट शेअर केली. ज्यात वैभवने स्वत: चा एक फोटो शेअर करत ‘New Chapter ‘ असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या या पोस्टमुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. ही पोस्ट वैभवचे इंटरनॅशनल क्रिकेटमधील पदार्पणाचे संकेत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर वैभवच्या डेब्यूबाबत सातत्याने चर्चा केली जात आहे.(Vaibhav Sooryvanshi)

https://prahaar.in/2026/07/04/ind-vs-eng-rain-threat-looms-over-the-india-vs-england-match-will-the-match-be-called-off-due-to-rain/

New Chapter पोस्टमुळे चर्चांना उधान

वैभवच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.हे त्याच्या डेब्यूचे संकेत आहेत का? याबाबत लोक आपापले मत मांडत आहेत. विशेष म्हणजे आयर्लंड दौऱ्यावर वैभवला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, ज्यामुळे चाहते आणि माजी दिग्गज खेळाडू प्रचंड नाराज झाले होते. अगदी सुनील गावस्कर यांनाही समजू शकलेले नाही की, अखेर वैभवला आयर्लंड दौऱ्यात संधी का देण्यात आली नाही? इतकेच नव्हे तर आयर्लंड दौरा हे एक असे व्यासपीठ होते जिथे वैभवला संधी मिळायला हवी होती, असे रवी शास्त्री यांनीही मान्य केले आहे.(Ind vs Eng)

https://prahaar.in/2026/07/04/mumbai-hit-and-run-horrific-accident-in-mumbais-jogeshwari-delivery-boy-killed-after-being-hit-by-a-speeding-tanker/

गोलंदाजी प्रशिक्षकचे विधान चर्चेत

जरी वैभवच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे त्याच्या पदार्पणाबद्दलच्या चर्चांना उधाण आले असले तरी, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच संकेत दिला. दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी बोलताना मॉर्केल म्हणाले, “आमच्याकडे अभिषेक शर्मासारखा एक अव्वल दर्जाचा टी-२० फलंदाज आहे. संजू सॅमसनही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे, प्रशिक्षकाने खेळाडूंवर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठिंबा देणे योग्यच आहे. होय, एक तरुण खेळाडू संधीची वाट पाहत आहे आणि हे एक सकारात्मक चिन्ह आहे. तथापि, आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे—केवळ या दोघांवरच नाही, तर संपूर्ण संघावर.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here