पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचले आहे. कुलाबा येथे २९ मिमी, तर सांताक्रूझ येथे ४८.२ मिमी पावसाची आतापर्यंतची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, ४ जुलै रोजी मुंबई महानगर प्रदेशासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Bhandup Incident)
https://prahaar.in/2026/07/04/rain-has-lashed-mumbai-over-the-past-six-hours-many-areas-are-waterlogged-and-roads-have-been-closed-to-traffic/
View this post on Instagram
भांडुपमध्ये धक्कादायक घटना !
मुंबईत सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील भांडुप येथे मुख्य रस्त्यालगतचा रस्त्याचा एक भाग पूर्णपणे खचला आहे. रस्त्याच्या कडेला असलेला एक ट्रक आणि एक मोठे झाडही गाडले गेले, तसेच एका मोठ्या बांधकाम स्थळाजवळील मुख्य रस्त्याच्या कडेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, माती आणि सिमेंटचा मोठा भाग कोसळला आहे. सुदैवाने, रस्ता खचला तेव्हा वाहने काही अंतरावर होती, परंतु यामुळे महामार्गावरील वाहतुकीत मोठा व्यत्यय आला असून जवळच्या इमारतींना गंभीर धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मुंबईतील मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे पायाभूत सुविधांचे किती नुकसान होते, हे दिसून येते.
https://prahaar.in/2026/07/04/anjanari-ghat-accident-horrific-accident-involving-a-trailer-in-anjanari-ghat-driver-dramatically-rescued-after-being-trapped-in-twisted-metal-sheets/
View this post on Instagram
नागरिकांना मुख्यमंत्र्यांचे आव्हान
हवामान विभागाने मुंबई शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिसरातील अनेक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. “तुम्ही ‘अलर्ट’ पाहिल्यानंतरच घराबाहेर पडावे आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आला असून, राज्य सरकाराने दर तीन तासांनी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना पाठवत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन तयारीबद्दलही माहिती दिली.(Devendra Fadnavis)