महापौरांनी केला घुसखोरीचा आरोप, पोलिसांत नोंदवणार तक्रार
मुंबई (Mumbai): मुंबई महापौर रितू तावडे या कार्यालयात नसताना त्यांच्या दालनात शिरुन विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली.तसेच त्यांनी आपण दिलेल्या पत्रांचे काय झाले याची विचारणा करताना कर्मचाऱ्यांकडून या पत्रांच्या छायांकित प्रती मोबाईलवर काढून घेतल्या.त्यामुळे महापौरांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून आपण दालनात नसताना त्यांनी येवून अशाप्रकारे दमदाटी करणे आणि कागदपत्रे पडताळून त्यांचे फोटो काढून घेणे हा गुन्हा आहे. आजवरच्या इतिहासात असा प्रकार कधी घडला असून आपली गोपनीय पत्रा चाळून त्यांचे फोटो घेतल्याने या घुसखोरीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवणार असल्याचे स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/07/03/finally-the-game-is-turned-relief-to-siya-chetan-in-ketan-aggarwal-murder-case-court-rejects-demand/
मुंबईच्या महापौर यांचे दालन महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर असून याठिकाणी सचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. परंतु दुपारी पावणे चारच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर हे नगरसेवक अंकित प्रभू यांच्यासह काही लोकांना घेवून आतमध्ये शिरले. त्यांनी तिथे जाताना आधी प्रसारमाध्यमांना आपण महापौरांच्या दालनात जात असल्याचा संदेश पाठवला.त्यामुळे काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे आधीच कॅमेरांसह तिथे पोहोचले होते. त्यामुळे चॅनेलच्या कॅमेरांसमोर विरोधी पक्षाने नौटंकी सुरु करत महापौरांच्या कर्मचाऱ्यांना दमात घेत माझ्या पत्रांचे काय झाले असा सवाल करण्यास सुरुवात केली. मी २०मार्च, ३०मार्च, १५जून, १२ जून, १६जून रोजी सभा घेण्यासंदर्भात पत्र दिली होती. परंतु या सर्व पत्रांचे काय झाले? तुम्ही महापौरांना दिले का नाही असा सवाल करत ज्या मी पत्रे दिली होती, त्याच घटना आता घडत आहेत. त्यामुळे माझ्या सर्व पत्रांचे काय झाले याची मला विस्तृत माहिती मिळायला हवी. आपण त्वरीत मला ही उपलब्ध करून द्या असे सांगत महापालिका सचिवांना तातडीने बोलावून घेण्याचे निर्देश दिले.
https://prahaar.in/2026/07/03/sassoon-dock-to-be-modernized-in-collaboration-with-finnish-companies-meeting-held-between-assembly-speaker-rahul-narwekar-and-minister-nitesh-rane/
या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्ष नेत्यांच्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मी दालनात नसताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या ३.४५ मिनिटाला माझ्या दालनात आल्या आणि त्यांनी एका व्यक्तीला फोन देवून त्याद्वारे माझ्या दालनाचे चित्रण करायला सांगितले. ही एकप्रकारे माझ्या दालनाची रेकी तथा ट्रेस पासिंग केली. आणि माझ्या दालनातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. सभाशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचे असून महापालिकेच्या इतिहासात एका विरोधी पक्षनेत्याने असे कृत्य करण्याची ही पहिली घटना आहे. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही चाळली. तसेच महापालिका सचिवांना बोलावून त्यांच्या माध्यमातून पेपर मागवून घेतले आणि फोटो काढले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची हे योग्य नाही. विरोधी पक्षनेत्या या माझ्या दालनात येवू शकतात आणि पत्रांची विचारणाही करू शकतात. पण त्यांचे फोटो काढणे आणि दमदाटी करणे हे अयोग्य आहे. यासंदर्भात त्यांनी मला भेटून विचारायला हवे होते. माझ्या कर्मचाऱ्यांना दम का दिला असा सवाल महापौरांनी केला आहे.
मी दिवसभर अनेक ठिकाणी पावसात फिरून मॅनहोल्स, तसेच साचणारे पाणी आणि झाडांचीही पाहणी करत आहे. मी दालनात नाही हे माहित असताना ते येवू दमदाटी करता हे विरोधी पक्षाला शोभत नाही. त्यामुळे याविरोधात आपण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. आणि ही उबाठाची जुनी कार्यपध्दती आहे. पण आताही चालणार नाही. आम्ही आजवर रस्त्यावर उतरुन काम करत आहोत. त्यांच्यासारखे घरात आणि कॅबिनमध्ये बसून काम करत नाही. त्यामुळे कॅबिनमध्ये बसून काम करणाऱ्यांना आम्हाला शिकवू नये,असाही सवाल केला आहे.
https://prahaar.in/2026/07/03/a-major-opportunity-for-youth-under-the-third-phase-of-the-prime-ministers-internship-scheme/
माजी विरोधीपक्षनेते आणि भाजपचे स्वीकृत सदस्य प्रविण छेडा यांनी विरोधी पक्षनेत्यांनी आपला प्रोटोकॉल सांभाळायला हवी. ते शंभर टक्के चुकलेले आहेत. त्यांनी महापौरांना विचारायला हवे होते आणि त्याला उत्तर द्यायला महापौर सक्षम होते. तसेच भाजपच्या आशा मराठे यांनी अजुनही किशोरी पेडणेकर या महापौरपदाच्या अविर्भवात असून त्यांनी आता आपण महापौर नाही आहोत याची जाणीव करून घ्यायला हवी.