मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमिततेचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुकारलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’वर आणि ‘महाआरती’च्या घोषणेवर शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात हिंदुत्वाची विचारसरणी बाजूला ठेवणाऱ्या ठाकरेंना आता राजकीय स्वार्थासाठी पुन्हा राम मंदिराची आणि हिंदुत्वाची आठवण झाली आहे, अशी जळजळीत टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली आहे.(Shivsena)
https://prahaar.in/2026/07/03/is-the-responsibility-of-pulling-haffkine-out-of-the-quagmire-of-corruption-with-tukaram-mundhe/
विशेषतः आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. “तुमच्याकडे आता कोणतेही राजकीय कार्यक्रम उरलेले नाहीत आणि पक्ष संपत आल्यामुळेच तुम्ही आता राम मंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे,” असा थेट टोला त्यांनी लगावला. मंदिरात चोरी करणाऱ्यांचे कोणीही समर्थन करणार नाही आणि या प्रकरणात आधीच आठ जणांना अटक झाली आहे, असे स्पष्ट करत शिरसाट यांनी ठाकरेंना राजकारण थांबवण्याचा आणि आधी स्वतः अयोध्येत जाऊन मंदिर पाहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरे स्वतःला राम आणि हनुमानाचे भक्त म्हणवतात, पण वेळप्रसंगी याच देवांना सोडून ते ‘रावणासोबत’ जाऊन युती करतात, अशी अत्यंत तिखट आणि थेट टीका शिरसाट यांनी केली. २०१९ मध्ये केलेल्या या ‘रावण’ युतीचे काय परिणाम होतात, हे महाराष्ट्रातील जनता उत्तम प्रकारे जाणून आहे, असा घणाघातही त्यांनी केला.(Shivsena)
https://prahaar.in/2026/07/03/uddhav-thackeray-maligns-the-ram-mandir-to-appease-his-abba-in-pakistan/
दुसरीकडे, मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘महाआरती’च्या निर्णयाची खोचक शब्दांत कोंडी केली आहे. ठाकरेंनी ही महाआरती करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील त्यांचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेतले आहे का, असा जाहीर सवाल देसाई यांनी उपस्थित केला. केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी ज्यांनी हिंदुत्वाची मूळ विचारधारा गुंडाळून ठेवली, त्यांना आता महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे हिंदुत्वाकडे वळत असल्याचे समजल्यामुळेच हा हिंदुत्वाचा पुळका आला आहे, अशी टीका त्यांनी केली. ठाकरेंचे हे हिंदुत्व कायमस्वरूपी नसून केवळ एक निवडणुकीचा ‘दिखावा’ आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे, असे देसाई यांनी सांगितले.(Shivsena)
https://prahaar.in/2026/07/03/vidhansabha-monsoon-session-dispute-in-both-houses-of-the-legislature-due-to-absence-of-ministers/
या संपूर्ण वादात मंत्री उदय सामंत यांनीही ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या बेगडी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘शिवसेना काँग्रेसमय होणार असेल तर मी माझे दुकान बंद करेन’ या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र विचारांना हरताळ फासून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ठाकरांचे हिंदुत्व कुठे गेले होते, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिणकस टीका केली, तेव्हा गप्प बसणाऱ्यांना आता खरी शिवसेना लोकांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे पाहून सावरकर आठवू लागले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी विरोधाची भाषा करणाऱ्यांनी आता मंदिरातील कथित गैरव्यवहाराचे भांडवल करून ‘हिंदूंचे रक्षक’ असल्याचा आव आणणे हास्यास्पद आहे, असे म्हणत सामंत यांनी ठाकरेंना आरसा दाखवला.