मुंबई : देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation – (EPFO)) आजपासून आर्थिक वर्ष २०२५-२६ चे पीएफ (Provident Fund -(PF)) व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील १५ दिवसांत सुमारे ७.५ कोटी ईपीएफ (EPF) सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होईल. यंदा केंद्र सरकारने ८.२५ टक्के वार्षिक व्याजदर (Interest Rate) मंजूर केला आहे.
१० लाख रुपयांवर ८२,५०० रुपये व्याज मिळेल का?
अनेकांचा समज असा असतो की, ३१ मार्च २०२६ रोजी पीएफ खात्यात १० लाख रुपये असतील तर त्यावर थेट ८२,५०० रुपये व्याज मिळेल. मात्र, ही गणना अचूक नाही. ईपीएफओ (EPFO) व्याजाची गणना वर्षअखेरीच्या एकूण शिल्लकीवर करत नाही. ती दर महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर (Monthly Closing Balance) केली जाते आणि संपूर्ण व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.
पीएफ (PF) व्याजाची गणना कशी केली जाते?
वार्षिक व्याजदर : ८.२५ टक्के
मासिक व्याजदर : ८.२५ ÷ १२ = ०.६८७५ टक्के
प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर व्याजाची गणना केली जाते.
संपूर्ण व्याज ३१ मार्च रोजी खात्यात जमा केले जाते.
https://prahaar.in/2026/07/03/venezuela-earthquake-security-guard-survives-after-being-trapped-under-rubble-for-8-days-emerges-alive/
दरमहा १०,००० रुपये पीएफमध्ये जमा केल्यास किती व्याज मिळेल?
समजा, एखाद्या कर्मचाऱ्याने १ एप्रिल २०२५ पासून दरमहा १०,००० रुपये पीएफमध्ये जमा केले. वर्षभरात त्याची एकूण ठेव १,२०,००० रुपये होईल.
या ठेवीवर मिळणारे एकूण व्याज सुमारे ५,३६२.५० रुपये असेल.
त्यामुळे वर्षअखेरीस खात्यातील एकूण रक्कम:
मूळ ठेव : १,२०,००० रुपये
व्याज : ५,३६२.५० रुपये
एकूण शिल्लक : १,२५,३६२.५० रुपये
हीच रक्कम पुढील आर्थिक वर्षासाठी सुरुवातीची शिल्लक मानली जाईल.
https://prahaar.in/2026/07/03/fifa-world-cup-2026-portugals-emphatic-2-1-victory-over-croatia-storm-into-the-round-of-16/
१० लाख रुपयांवर प्रत्यक्षात किती व्याज मिळेल?
समजा, ३१ मार्च २०२५ रोजी तुमच्या पीएफ खात्यात ८,८०,००० रुपये आहेत आणि पुढील वर्षभरात दरमहा १०,००० रुपये जमा करून एकूण १,२०,००० रुपये भरले जातात. अशा परिस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी खात्यातील एकूण रक्कम १० लाख रुपये होते.
मात्र, व्याज दरमहा वाढणाऱ्या शिल्लकीवर मोजले जात असल्याने तुम्हाला ८२,५०० रुपये नव्हे, तर सुमारे ७७,९६२.५० रुपये व्याज मिळेल.
यानंतर खात्यातील एकूण रक्कम १०,७७,९६२.५० रुपये होईल.
पीएफ (PF) व्याजाची रक्कम तुमच्या खात्यातील अंतिम शिल्लकीवर एकदाच मोजली जात नाही. दर महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर व्याजाची गणना करून ते आर्थिक वर्षाच्या शेवटी एकरकमी जमा केले जाते. त्यामुळे वर्षभरातील योगदान (Contribution) आणि शिल्लक यानुसार प्रत्येक सदस्याला मिळणारी व्याजाची रक्कम वेगवेगळी असू शकते.