बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या कार्यालयाला एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. (Cyber Threat)
https://prahaar.in/2026/07/02/women-farmers-empowerment-bill-passed-unanimously-in-the-legislative-assembly/
माहितीनुसार, धमकीचा ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणांनी त्वरित कारवाई करत इस्रो मुख्यालयाची कसून तपासणी सुरू केली. बॉम्ब स्क्वाडने संपूर्ण परिसराची सखोल तपासणी केली असून प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळलेली नाही. दरम्यान, या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पथकांच्या मदतीने तपास करत आहेत. हा ई-मेल देशाबाहेरून पाठवण्यात आला आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.अशा प्रकारची धमकी मिळण्याची ही पहिली घटना नाही. ( Bomb Threat)
https://prahaar.in/2026/07/02/grant-of-%e2%82%b920000-each-for-1400-manachya-honorary-prestige-holding-dindis-for-the-ashadhi-wari/
यापूर्वीही दिल्लीतील काही शाळांना अशाच प्रकारचे बॉम्ब धमकीचे ई-मेल मिळाले होते, ज्यामुळे त्या भागात मोठी सुरक्षा तपासणी करण्यात आली होती. सध्या इस्रो परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.