Home ब्रेकिंग न्यूज Tata Power Plant : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची टाटा पॉवर प्लांटला भेट; औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेची केली पाहणी

Tata Power Plant : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची टाटा पॉवर प्लांटला भेट; औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेची केली पाहणी

0
Tata Power Plant : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची टाटा पॉवर प्लांटला भेट; औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेची केली पाहणी

मुंबई, दि. 3 : चेंबूर (Chembur) येथील माहूल रोडवरील टाटा पॉवरच्या थर्मल पॉवर जनरेशन स्टेशनला राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर ( Akash Fundkar) यांनी भेट देऊन प्लांटमधील कामकाजाचा आढावा घेतला. या भेटीत औद्योगिक सुरक्षा, बॉयलर यंत्रणेचे कामकाज आणि आधुनिक तांत्रिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यात उपसचिव दीपक पोकळे, बाष्पके संचालक धवल अंतलूरकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. टाटा पॉवरचे ट्रॉम्बे प्रमुख आशिष भट (Ashish Bhat) यांनी कामगार मंत्र्यांचे स्वागत करून प्लांटमधील दैनंदिन कामकाज, तांत्रिक आव्हाने आणि त्यावर राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

https://prahaar.in/2026/07/02/prime-minister-modi-and-japanese-prime-minister-takaichi-inaugurated-the-maruti-suzuki-kharkhoda-plant/

पाहणीदरम्यान मंत्री फुंडकर यांनी वीज निर्मिती प्रक्रियेतील विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या. युनिटची क्षमता, उपकरणांची कार्यक्षमता तसेच समुद्राच्या खारट पाण्याचा वापर करताना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (Tata power plant)

याशिवाय, औद्योगिक क्षेत्रातील सायबर सुरक्षेच्या वाढत्या गरजेच्या पार्श्वभूमीवर प्लांटमध्ये उभारण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणेची माहितीही त्यांनी घेतली. संभाव्य सायबर हल्ल्यांपासून प्लांटचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

https://prahaar.in/2026/07/02/major-operation-by-the-indian-navy-in-the-gulf-of-aden-pirate-attack-thwarted/

भविष्यात नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर, इलेक्ट्रिक वाहनांची वाढ आणि त्याचा पारंपरिक औष्णिक वीज प्रकल्पांवर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली. या बदलांमुळे थर्मल प्लांटचे कामकाज तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

भेटीच्या शेवटी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी औद्योगिक सुरक्षा आणि कामगारांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षा मानकांमध्ये कोणतीही तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांट अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here