Home ब्रेकिंग न्यूज US Egg Price Scam : अंड्यांच्या किमतीत ७०% वाढ; अमेरिकेत ३ कंपन्यांवर कारवाई, ५.३ कोटी अंडी मोफत वाटावी लागणार

US Egg Price Scam : अंड्यांच्या किमतीत ७०% वाढ; अमेरिकेत ३ कंपन्यांवर कारवाई, ५.३ कोटी अंडी मोफत वाटावी लागणार

0
US Egg Price Scam : अंड्यांच्या किमतीत ७०% वाढ; अमेरिकेत ३ कंपन्यांवर कारवाई, ५.३ कोटी अंडी मोफत वाटावी लागणार

अमेरिका : अमेरिकेतील (America) कॅल-मेन फूड्स, वर्सोवा आणि हिकमन्स एग रँच या तीन प्रमुख अंडी उत्पादक कंपन्यांनी जून २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत बर्ड फ्लूच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अंड्यांच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवल्याचा आरोप आहे. ( Egg Price Hike)

तपासानुसार, कंपन्यांनी बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून अंड्यांच्या किमती तब्बल ७० टक्क्यांनी वाढवल्या. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेत एका डझन अंड्यांची किंमत 9 डॉलर (सुमारे 750 रुपये) इतकी झाली होती. काही भागांमध्ये अंडी कार्टनऐवजी एकेकटी विकली जात होती.

https://prahaar.in/2026/07/02/shocking-twist-in-the-ketan-agarwal-case-brother-served-a-notice-for-%e2%82%b910-crore-what-exactly-is-the-matter/

प्रकरण उघड झाल्यानंतर अमेरिकेच्या न्याय विभागाने संबंधित कंपन्यांवर कारवाई करत त्यांना एकूण ३.३ दशलक्ष डॉलर (सुमारे ३१.२ कोटी रुपये) नुकसानभरपाई भरण्याचे आदेश दिले. तसेच, ५.३ कोटी अंडी अन्न बँका आणि पोषण योजनांमार्फत गरजू नागरिकांना मोफत वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/07/01/weather-department-warning-rainfall-intensity-to-increase-in-the-state-next-100-hours-crucial/

दरम्यान, तिन्ही कंपन्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून त्यांनी सर्व व्यवहार कायदेशीर चौकटीत राहून केल्याचा दावा केला आहे.