Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

0
Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यासाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Rain Alert)

हवामान विभागानुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणावर द्रोणीय रेषा पसरली आहे. त्यामुळे कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत चांगला पाऊस, तर विदर्भात व्यापक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/07/01/sachin-ahir-sachin-ahir-unanimously-elected-as-deputy-chairman-of-the-legislative-council/

२ ते ४ जुलैदरम्यान कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४ ते ६ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Update)

३० जून ते ४ जुलैदरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सखल भागात पाणी साचणे, शहरी भागात जलमय परिस्थिती, घाट रस्त्यांवर भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवासापूर्वी रस्त्यांची माहिती तपासावी. खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Heavy Rain Alert)

https://prahaar.in/2026/07/01/ek-hota-malin-spine-chilling-teaser-of-ek-hota-malin-released/

शेतकऱ्यांना भातशेती व भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचा तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here