Home लाईफस्टाईल ‘वूमेन पावर इम्पॅक्ट क्रिएटर ऑफ द इयर’

‘वूमेन पावर इम्पॅक्ट क्रिएटर ऑफ द इयर’

0
‘वूमेन पावर इम्पॅक्ट क्रिएटर ऑफ द इयर’

मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एमईटी)च्या वरिष्ठ व्यवस्थापन प्रतिनिधी श्रीमती विशाखा भुजबळ यांना शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘वूमेन पावर इम्पॅक्ट क्रिएटर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ११ व्या वार्षिक ‘वूमेन पावर समिट अँड अॅवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात ‘शिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यातील उत्कृष्टतेसाठी’ परीक्षकांची विशेष पसंती (ज्युरी स्पेशल चॉइस) या श्रेणीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विशाखा भुजबळ यांनी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीबाहेर जाऊन समाजाभिमुख, शाश्वत आणि सर्वसमावेशक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्कारातून घेण्यात आली. शिक्षणाला केवळ पदवी मिळवण्याचे साधन न मानता व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे प्रभावी माध्यम बनवण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा गौरव करण्यात आला.

https://prahaar.in/2026/06/29/the-years-most-beautiful-strawberry-moon-will-be-visible-today/

पुरस्कार स्वीकारताना त्यांनी नेतृत्वाची नवी व्याख्या मांडली. “नेतृत्व म्हणजे अधिकार गाजवणे नव्हे, तर लोकांना त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे होय. मनाला सुशिक्षित करणे, समाजाचा उद्धार करणे आणि प्रत्येकाच्या अंतरात्म्याचा सन्मान राखणे यातूनच खऱ्या अर्थाने प्रगती साध्य होते,” असे त्या म्हणाल्या.
विशाखा भुजबळ यांचे कार्य विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाशी निगडित आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. एका महिलेला सक्षम करणे म्हणजे संपूर्ण कुटुंब आणि पुढील पिढीच्या विकासाला गती देणे, या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे महिलांना शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

 

https://prahaar.in/2026/06/28/kidambi-srikanth-won-the-hearts-of-the-spectators-with-his-sportsmanship/

याशिवाय महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘वारली’ कलेच्या जतन आणि संवर्धनासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वारली कलाकारांना केवळ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यापुरते न थांबता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कलात्मकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कलाकारांना सन्मानजनक उपजीविका मिळाली असून, वारली कलेच्या संवर्धनालाही नवी दिशा मिळाली आहे. ‘बिलेनिअम दिवास’तर्फे आयोजित करण्यात येणारा ‘वूमेन पावर समिट अँड अॅवॉर्ड्स’ हा महिला उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेविका आणि विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणारा देशातील प्रतिष्ठित मंच मानला जातो. यंदाच्या परिषदेत वरिष्ठ सनदी अधिकारी, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि विविध क्षेत्रांतील २५० हून अधिक मान्यवर सहभागी झाले होते.

भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला चालना देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा या व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. विशाखा भुजबळ यांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या माध्यमातून उभारलेले तळागाळातील उपक्रम हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचे प्रभावी उदाहरण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक परिवर्तनासोबतच देशाच्या दीर्घकालीन आर्थिक आणि मानवी विकासालाही बळ मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here