Home महाराष्ट्र ठाणे Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

0
Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
hart attack

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थ्याचं नाव शिव पाल(Shiv pal) असं असून तो पावना येथील रहिवासी होता.

https://prahaar.in/2026/06/30/minister-bawankule-launches-a-scathing-attack-on-thackeray/

नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला आणि…

नवी मुंबईतील पावना परिसरात मृत शिव हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. नेहमीप्रमाणे सकाळी तो नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-५ येथील विवेकानंद महाविद्यालयात आला होता. शिव पाल हा इयत्ता बारावीत(12th) शिकत होता. सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयाच्या तळमजल्यावर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. शिव पाल अचानक कोसळल्यामुळे गोंधळ उडाला. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

https://prahaar.in/2026/06/30/no-relief-for-asaram-from-the-supreme-court/

घटनेची माहिती शिव पाल याच्या घरी समजल्यावर त्याच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here