Home ब्रेकिंग न्यूज Saudi Arabia Helicopter Crash : सौदी अरेबियात अरामकोचं हेलिकॉप्टर कोसळलं; १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

Saudi Arabia Helicopter Crash : सौदी अरेबियात अरामकोचं हेलिकॉप्टर कोसळलं; १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

0
Saudi Arabia Helicopter Crash : सौदी अरेबियात अरामकोचं हेलिकॉप्टर कोसळलं; १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
Saudi Helicopter Crash

सौदी अरेबिया : फ्रान्समधील खासगी विमान (Private Plane) दुर्घटनेनंतर आता सौदी अरेबियामध्ये आणखी एक मोठी हवाई दुर्घटना घडली आहे. सौदी अरेबियातील प्रमुख पेट्रोलियम (Petroleum) कंपनी अरामको (Aramco) चे हेलिकॉप्टर (Helicopter) कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिकाऱ्यांनी चौकशी (Investigation) सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील रास तनुरा (Ras Tanura) परिसरात सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर (Helicopter) कोसळल्यानंतर त्यातील सर्व १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वजण सौदी अरेबियाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/06/29/ketan-agarwal-murder-case-new-revelation-in-the-ketan-agarwal-murder-case-methods-of-murder-were-searched-for-on-google-and-practice-was-carried-out-at-a-fort/

विशेष म्हणजे, हे हेलिकॉप्टर (Helicopter) अरामको (Aramco) कंपनीचे होते. रास तनुरा (Ras Tanura) येथील ऑईल टर्मिनल (Oil Terminal) मागील चार महिन्यांपासून इराण (Iran), इस्रायल (Israel) आणि अमेरिका (USA) यांच्यातील संघर्षामुळे बंद होते. युद्धविरामानंतर (Ceasefire) येथे कच्च्या तेलाचे (Crude Oil) लोडिंग (Loading) पुन्हा सुरू करण्यात आले होते. कामकाज (Operations) सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेबद्दल सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने (Energy Ministry) तीव्र दु:ख व्यक्त केले असून, हेलिकॉप्टर (Helicopter) दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी (Investigation) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल (Report) मागविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here